Copy

न्यूजलेटर - एप्रिल २०१६.

सुस्वागतम,
स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबईच्या एप्रिल २०१६ च्या न्यूजलेटर प्रकाशित करताना वाचकांच्या वाढत्या संख्येबाबत समाधान व्यक्त करावेसे वाटते.

बचत गट मोहिम जोमाने सुरु आहे, स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई देखील आपला खारीचा वाटा उचलून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. 

स्वयंसिध्दा फाऊंडेशन द्वारे नुकतेच महिलांकरिता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद लाभला होता. सरतेशेवटी स्वयंसिध्दा फाऊंडेशन असु देत किंवा अन्य कोणी आपल्या आयुष्यात बदल आपल्यालाच घडवावा लागतो.

आपल्याकडील लेख व अन्य प्रेरणादायी सामुग्री आपल्या या न्यूजलेटरसाठी पाठवा ही विनंती.

संपादकीय मंडळ
स्वयंसिध्दा फाऊंडेशन,
मुंबई

पेपर बॅग्ज मेकींग प्रशिक्षण

१२ मार्च २०१६ रोजी सिडनम इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चर्चगेट, मुंबई येथे बचत गटातील महिलांकरिता पेपर बॅग्ज बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदरच्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असुन आगामी काळात या महिलांकरिता सराव वर्ग आयोजित केला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिडनम इंस्टीट्यूट च्या स्टूडंट्स सोशल रिस्पॉन्सीबीलीटी कमिटी च्या खालील सदस्यांचे स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई हार्दिक आभार व्यक्त करीत आहे.

१) निकिता सालीयन २) अमित गुलीग ३) अतिश यादव  ४) ललित शर्मा  ५) मनिष जांभेकर  ६) मिहिर पाटील  ७) मोहित कटारिया  ८) शरमिष्ठा दास

९) सुनिल यादव   १०) तुषार खेडेकर  ११) विपुल तावडे

तसेच संस्था सौ.स्नेहा चौधरी, विरार यांचे आभार व्यक्त करिते ज्यांच्या प्रयत्नांने विरारहून काही सदस्यांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला.

डोंबिवली येथे बचत गट कार्यशाळा

स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई द्वारा डोंबिवली येथील एस.व्ही. जोशी विद्यालयात, महिला बचत गटांकरिता दिनांक २६.०३.२०१६ रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदरची कार्यशाळा स्थानिक नगरसेविका सौ. खुशबु चौधरी यांच्या प्रयत्नाने आयोजित झाली.

या कार्यशाळेत उपस्थितांना, बचत गट कसा बनवावा, तो कसा चालवावा व त्या मार्गे स्वयंरोजगार कसा करावा आदि विषयांवर माहिती देण्यात आली. संस्थेचे श्री समीर मंचेकर व श्री. विजय जोशी यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

उपस्थित बचत गट संस्थेच्या 'मदर एनजीओ' या कार्यक्रमा अंतर्गत नोंदणी करणार आहेत

आगामी कार्यक्रम
आर्थिक साक्षरता अभियान
सदरचा मार्गदर्शन वर्ग स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई व बॉम्बे स्टॉक एक्सेंज द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात, बचत कशी करावी, बचत करण्यासाठी उपलब्ध विविध मार्ग, फसव्या योजनांपासुन कसे वाचावे, आपला पैसा कमी वेळात कसा वाढवावा, शेअर बाजारातील पर्याय आदी विषयांवर माहिती देण्यात येईल. माहिती बॉम्बे स्टॉक एक्सेंजच्या प्रशिक्षकांद्वारे देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रु ५०/- इतकी फी असणार आहे व हा कार्यक्रम महिला व पुरुषांकरिता असणार आहे. कार्यक्रमाची तारीख व वेळ लवकरच घोषित करण्यात येईल.
बचत गट विश्वातील बातमी
Women Saving Group to get stalls at S T depot in Maharashtra - Click here
Copyright © *2016* * Swayamsiddha Foundation, Mumbai|, All rights reserved.

Our mailing address is:
swayamsiddhafoundation@gmail.com

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list


This email was sent to <<Email Address>>
why did I get this?    unsubscribe from this list    update subscription preferences
Swayamsiddha Foundation, Mumbai · Malad West · Mumbai 400064 · India

Email Marketing Powered by MailChimp