Copy

न्यूजलेटर

 

सुस्वागतम,
स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबईच्या ऑक्टोबर २०१६ महिन्याच्य न्यूजलेटर प्रकाशित करताना वाचकांच्या सुरुवातीला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहोत.

स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई, गेली १० वर्षे, बचत गट व स्वयंरोजगार या क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. गेल्या १० वर्षात हजारोच्य संख्येने बचत गाटांमधील मंडळींच्या संपर्कात संस्था आली. आनेक यशोगाथा नोंदविल्या. अनेक उत्साहवर्धक अनुभव आले, काही कटु प्रसंग देखील अनुभविले.

हे उपक्रम आता पर्यंत केवळ मुंबई, ठाणे, रायगड येथे आयोजित झाले. आता कक्षा रुंदाविण्याची वेळ आली आहे. स्वयंसिध्दा आता तालुका व जिल्हा निहाय समन्वयक नेमूण संपूर्ण राज्यात काम करणार आहे. तुम्ही तुमच्या विभागात संस्थेचे प्रतिनिधी म्हणुन काम करावयाचे असेल. तर या चालवलीत सहभागी व्हा.

या बाबतची अधिक घोषणा लवकरच करण्यात येईल. तुम्हा सर्वांचीच साथ लाभली आहे. या कार्यात आपला खारीचा वाटा प्रत्येकाने / प्रत्येकीने आवर्जुन उचलावे हे आवाहन.

गेल्या कही महिन्यातील वाटचालीची माहिती, काही व्यवसाय संधी, यशोगाथा इत्यादीची माहिती या न्यूजलेटर मधे देण्यात आले आहे.

आपल्याकडील लेख व अन्य प्रेरणादायी सामुग्री आपल्या या न्यूजलेटरसाठी पाठवा ही विनंती.

संपादकीय मंडळ
स्वयंसिध्दा फाऊंडेशन,
मुंबई

नवरात्री व दुर्गापुजेच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

जे गट दिवाळीच्या फरळाचे जिन्नस बनवितात, आशा गटानी swayamsiddhafoundation@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपल्या गटाची माहिती, पत्ता, संपर्क क्रमांक, बनविणारे खाद्य पदार्थ, त्यांचे प्रति किलो दर, इत्यादि त्वरित कळवावी. संस्थेस आलेल्या चौकशी आशा गटाना ईमेल द्वारे कळविले जाईल।

मिरा भाईंदर महानगर पालिकेद्वारे महिला बचतगटांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

मिरा भाईंदर महानगर पालिकेद्वारे महिला बचतगटांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले होते, या शिबिरात स्वयंसिद्धा फ़ॉउंडेशन, मुंबईस मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले गेले होते.

सुमारे २०० महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला. शिबिरास ​​मिरा भाईंदरच्या महापौर, उप-महापौर, आयुक्त, उपायुक्त इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यशोगाथा एका उद्योगीनीची

स्वयंसिध्दा फाउंडेशन, मुंबईने सिडनहॅम इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, चर्चगेट च्या सहकार्याने महिलनकारिता पेपर बॅग्स बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्या प्रशिक्षणात सौ.सुवर्णा वाघ, विरार यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणानंतर त्यांनी आपल्या इतर व्यवसायासोबतच कागदी बॅग्स बनविण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

त्यांच्या या यशोगाथेची दखल झी बिझनेस या वृत्तवाहिनीने घेतली असून त्यांची प्रकट मुलाखत आज दुपारी ४. मिनिटांनी झी बिझनेस वर दाखविली जाणार आहे.

सौ. वाघ यांना त्यांच्या भविष्यातील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.

स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई

बचत गट मार्गदर्शन

स्वयंसिद्धा फाऊंडेशन, मुंबई, कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या "बचत गट मार्गदर्शन" कार्यशाळेत सहभागी होणार झाली. सदरच्या कार्यशाळेत उपस्थितांना बचत गट या विषयावर सखोल माहिती पुरविली गेली.

 

संस्थेच्या वतीने श्री.विजय जोशी, श्री.समीर मंचेकर, कु.रुपाली केदार उपस्थित होते तर कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे श्री. राजन तावडे, श्री. राजन केळुस्कर व अन्य सदस्य उपस्थित होते.

व्यवसाय मार्गदर्शन शिबीर

कोकण विकास प्रतिष्ठान, मुंबईने आज दादर येथे  व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. बँक वित्त सहाय्य व प्रकल्प अहवाल कसा बनवावा या विषयावर स्वयंसिद्धा फौंडेशन द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे ६० होतकरू संभाव्य उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. 

 

कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे श्री राजेंद्र तावडे, श्री राजन केळुस्कर व त्यांचे सहकारी व स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई तर्फे श्री विजय जोशी व श्री समीर मंचेकर उपस्थित होते.

बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरु केले आहे. हे चॅनल मोफत असुन येथे बचत गट व व्यवसाय या विषयावर माहिती दिली जाते. चॅनल येथे उपलब्ध आहे.


स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई

ए-२०३, आकार आर्केड, सीगल सोसायटी,
दादीशेठ रोड, बॉम्बे टॉकीज कंपाऊंड समोर,
मालाड पश्चिम, 
मुंबई ४०००६४  महाराष्ट्र

 

(कार्यालयात भेट देण्यापुर्वी ९९३०१४७१७९ या क्रमांकावर फोन करुन भेट निश्चित करणे बंधनकारक आहे)This email was sent to <<Email Address>>
why did I get this?    unsubscribe from this list    update subscription preferences
Swayamsiddha Foundation, Mumbai · Malad West · Mumbai, 400064 · India

Email Marketing Powered by Mailchimp